डॉक्टरने घेतला पत्नीच्या दंडाचा चावा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटूंबिक कारणातून वादावादी झाल्यानंतर चिडलेल्या डॉक्टर पतीने पत्नीच्या हाताचा चावा घेऊन शिवीगाळ केली. तर, तिला गाडीवरून जोरात ढकलून देत जखमी केले. याबाबत पत्नीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, खराडी येथील २७ वर्षीय डॉक्टरवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घोरपडे पेठ परिसरात घडली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणातून तक्रारदार आणि डॉक्टर पती यांच्यात वाद आहेत. ८ नोव्हेंबर रोजी तक्रारदार पतीला भेटण्यास त्यांच्या घोरपडेपेठ येथील क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. आपण दोघे एकत्र राहून संसार करून असे त्या पतीला म्हणाल्या. त्यावेळी आरोपी पती क्लिनिक बंद न करत तेथून निघाला. त्यावेळी तु मला एकटीला सोडून जावू नको असे म्हणून पतीच्या शार्टाला धरले, त्यामुळे राग आलेल्या पतीने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर जोरात चावा घेतला. त्यात त्या जखमी झाल्या. पुढे दोघे गाडीवर बसून बोलत निघाले होते. त्यावेळी डॉक्टरने रागात पत्नीला शिवीगाळ करत गाडीवरून ढकलून दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page