वृध्द इसमास रिक्षामधुन सोडणेच्या बहाण्याने त्याचे सामानातील रोख रक्कम चोरी करणारे..!

आरोपीस केले जेरबंद

वरिष्ठांचे आदेशान्वये युनिट-४ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी खडकी पोलीस ठाणे गु.र.नं. २१/२०२६ भा.न्या.सं.क.३०३ (२), ३४ अन्वये दि.१२/०२/२०२६ रोजी दाखल गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले. दिनांक १३/०२/२०२६ रोजी युनिट-४ चे पथक खडकी पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक, पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड व किशोर दुशिंग, यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन दिवसापुर्वी वाकडेवाडी बस स्टैंड येथे एका इसमांस बसवुन तीन चार इसमांनी त्याचे सामानामधुन पैसे चोरणारा इसम रिक्षाक्र. एमएच/१२/एचसी/४१०७ हीचेसह वाकडेवाडी बस स्टॅन्ड येथे येणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाली. सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांजन जाधव यांना कळविली असता त्यांनी खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

Advertisement

मा. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे युनिट-४ पथक वाकडेवाडी बसस्टॅड येथे सापळा लावुन थांबले असताना बातमीतील वर्णनाची रिक्षा दिसलेने सदर रिक्षा रस्त्याचे कडेला थांबवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्यांने त्याचे नाव इदरीश शफिक शेख वय ३६ वर्षे, रा. शिवसेना ऑफिसजवळ, बावधान पुणे, मुळ पत्ता- तुख्मापुर, हरवंश, नगीना, जिल्हा- बिजनौर, उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता प्रथम तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने दि.११/०२/२०२६ रोजी त्याचा मित्र व त्याचे इतर दोन साथीदार यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिलेने त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात फिर्यादी यांचे चोरीस गेलेल्या रक्कमे पैकी २४,५००/-रु. रोख रक्कम मिळुन आली तसेच गुन्हा करताना त्यांनी वापरलेली ऑटो रिक्षाक्र. एमएच/१२/एचसी/४१०७ असे एकुण १,४९,५००/-रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आलेने दोन पंचा समक्ष पंचनाम्याने जप्त केला आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २, श्री. राजेंद्र मुळीक, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-४, गुन्हे शाखा कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार, हरीष मोरे, एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार, सुभाष आव्हाड, किशोर दुशिंग, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, अमजद शेख, शरद झांजरे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page