आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बदलापूर : बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, ”बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता. याच आरोपी अक्षय शिंदेंवर त्याच्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. या प्रकरणात त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. त्यात निलेश मोरे जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी स्ववसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या आहेत. याचा पोलीस तपास सुरु आहे. निलेश मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.”

Advertisement

विरोधकांच्या टिकेबद्दल एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”ज्यावेळेस बदलापूरची घटना घडली तेव्हा विरोधक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. ज्याने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले त्याची बाजू जर विरोधक घेत असतील तर, हे दुर्दैव आहे. अशा प्रकारे आरोपीची बाजू घेणे हे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. विरोधी पक्षाला विरोधात बोलण्याचा अधिकार आहे. आज एक पोलीस अधिकारी जखमी आहे. त्याच काहीच घेणंदेणं विरोधी पक्षाला नाहीये. पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात. विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने त्यांची झोप उडवलेली आहे. त्यामुळेच हे उलट सुलट आरोप ते करत आहेत.”

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page