दोन विधीसंघर्षित बालक ताब्यात व त्यांचेकडुन एक गावठी पिस्तुल जप्त..!

मांजरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. बाबासाहेब निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तसेच पोलीस अंमलदार सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार व अशोक अंधारे यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे येथील गेटजवळ दोन संशयित इसम गावठी पिस्तुलसह येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ नियोजनबद्ध सापळा रचुन दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांची चौकशी केली असता ते विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडती दरम्यान एका विधीसंघर्षित बालकाकडे एक गावठी बनावटीचे ५०,०००/- रु.कि. चे पिस्तुल मिळून आलेने आले. जप्त करण्यात आले आहे.

Advertisement

सदर प्रकरणी मांजरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ९५/२०२६ अन्वये दोन विधीसंघर्षित बालकांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ (५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही, मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे श्री. अनुराधा उदमले मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांजरी पोलीस स्टेशन, पुणे शहर बाबासाहेब निकम, यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, व पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page