पुण्यात पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार गजाआड; दोन पिस्तूल, काडतुसे जप्त

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या बातम्या उघडकीस येत असतात. अशातचं आता पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला सिंहगड रस्ता पोलिसांनी हिंगणे परिसरातून अटक केली आहे. त्याच्यासोबतच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

Advertisement

राज रवींद्र जागडे (वय २२, रा. वडगाव बुद्रूक, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जागडे सराइत गुन्हेगार आहे. हिंगणे परिसरातील कॅनोल रस्त्यावर तिघे जण थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त करण्यात आली. आरोपींनी पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page