पुण्यात अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना आयोजित लघुपट पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..!

पुण्यात अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना आयोजित लघुपट पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

प्रतिनिधी

Advertisement

४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ ते ८ यावेळेत अखिल भारतीय प्रहार चित्रपट पुरस्कार सोहळा संकल्प हॉल नवी पेठ येथे माजी राज्यमंत्री मा.बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
या पुरस्कारासाठी लघुपट चित्रपटांचे २६९ प्रस्ताव आले होते त्यातील १०० चित्रपट निवडण्यात आले व त्यामधून चार पुरस्कार जाहीर करण्यात आले.
त्यातील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस १,००,००० लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकास ७५,००० हजार रुपये , तिसऱ्या क्रमांकास ५०,००० हजार रुपये व उत्तेजनार्थ प्रत्येकी ५००० रुपये याप्रमाणे पुरस्कार ट्रॉफी व शाल श्रीफळ देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी मा.सुहास किर्लोस्कर ,मा.डॉ. अनमोल कोठारी , मा.सौ.अश्विनी धायगुडे कोळेकर यांनी समीक्षक म्हणून काम केले.
अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना आयोजित लघुपट पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित
पदाधिकारी
मा.संदीप मोहिते पाटील प्रदेश अध्यक्ष
मा.संतोष लांडे राज्य संघटक
मा.अमित मुळे राज्य संपर्क प्रमुख
मा.वेंकटेश कदम राज्य संपर्क प्रमुख
सौ.कविता गायकवाड महिला राज्य संपर्क प्रमुख
मा.मल्हारी गायकवाड पश्चिम महाराष्ट्र विभाग संपर्क प्रमुख
मा.मारुती पोतदार पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख
मा.शैलेंद्र अडसूळ मुंबई विभाग प्रमुख
मा.हंसराज पाटील पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मा.कांताभाऊ राठोड पत्रकार यांना विशेष सहकार्य म्हणून सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पडला यावेळी दिग्दर्शक तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार व नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page