सिंहगड पोलीस स्टेशन कडील वाहन जाळपोळ मधील पाहिजे आरोपीस युनिट-३ ने केले जेरबंद..!

सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिद्धेश्वर प्लाझा नन्हे पुणे येथील बिल्डींगचे कॉमन पार्किंगमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने येवुन सात गाडयांचे खेडसाळपणाने काहीतरी ज्वालाग्राही पदार्थ टाकुन ते पेटवुन देवुन सर्व दुचाकी गाड्यांचे नुकसान केले. यावरून सिंहगड पोलीस स्टेशन गु.र.नं.२७९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३२६ (ग) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार युनिट ३ चे कर्मचारी हे युनिट हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे व चेतन शिरोळकर यांना मिळालेल्या माहितीनुसार गाडी जाळण्याच्या प्रकरणांमध्ये दोन मित्रांमध्ये घरी सोडण्यावरून वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून एकाने त्याचे २ मित्रांसोबत येवुन सिद्धेश्वर प्लाझा नन्हे पुणे येथील बिल्डींगचे कॉमन पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटार सायकल पेटवुन दिली व त्यासोबत पार्किंगमधील इतर ६ गाड्या जळालेल्या असुन सदर इसम हा खडक पोलीस स्टेशकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याने त्याचे दोन मित्रांसोबत सदरचा प्रकार केला आहे. त्याची व त्याचे सोबतच्या दोन मित्रांची गोननीय माहिती काढुन सदर गुन्हयातील इसम १. सिद्धेश नितीन धुमाळ वय २३ वर्षे रा. ६७४ घोरपडीपेठ, पुणे व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांना पुढील कारवाई करीता सिंहगडरोड पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सपोफौ पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार अतुल साठे अमित बोडरे, कैलास लिम्हण, किशोर दुशिंग, महेंद्र तुपसौंदर पोशि चेतन शिरोळकर, उमेश मठपती, अक्षय गायकवाड, व पोहवा सुजीत पवार (चालक), म. पोलीस अंमलदार अर्चना वाघमारे व भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.




