विषय: महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश..!

१/- ज्याअर्थी पुणे शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, घरणे, निदर्शने, बंद व उपोषणा सारखे आंदोलनाचे आयोजन करतात, विविध कारणांमुळे तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. ज्याअर्थी पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. २/- त्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्यये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे. ३/- त्याअर्थी, मी मिलिंद मोहिते, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर वर नमूद अ.नं. २ च्या आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्द्रये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक २७/०५/२०२५ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक ०९/०६/२०२५ रोजी २४.०० वा पर्यंत १४ दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे. अ) कोणताही वाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे. ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किया फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. क) शस्त्रे, सोटे, माले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे ३) मोठ्याने अर्थाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिका करणे, उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे. क) पुणे शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस अधिका-याच्या मते, शालीनता किंवा शिष्टाबाराव्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तु किंवा बस्तु तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारीत करणे जेणे करून सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकणेस कारणीभुत ठरु शकेल, ग) यामुळे सम्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे. ह) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ व्या कलम ३७ (१) (२) (३) विरुध्द बर्तन करणे,
४/- महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ चे पोटकलम (३) पाच किंवा पाच
पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालीत आहे. ५/- वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हा आदेश खाजगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे ३.५ फूट पर्यंत लांबीपर्यंतच्या लाठ्या बाळगत आहेत, इत्यादींना लागू होणार नाही. ६/- सदरचे आदेशाला जाहिररित्या ठळक प्रसिध्दी दयावी. ७/- वर नमुद केलेल्या कालावधीनंतर या आदेशाची मुदत संपली तरीही आय) गुन्हेगाराची (Reel) रिल बनवून सोशल मिडीयावर टाकून दहशत पसरविणे किंवा धकमी देणे, अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही शुरु केली जावु शकते, चालु ठेवली जायु शकते किंवा लागू केली जायु शकते. ब) या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघन संदर्भात दंड, जप्ती किया शिक्षा लागू केल्या जादु शकतात. जणु हा आदेश कालाबाहय झाला नाही. ८/- या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. सदरचा आदेश माझ्या सही शिक्यानिशी आज दिनांक २४/०५/२०२५ रोजी दिला आहे. मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांचे मान्यतेने प्रत, (मिलिंद मौहिते) पोलीस उप-आयुका, विशेष शाखा, पुणे शहर १. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रशासन, पश्थिन व पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, २. सर्व पोलीस उप-आयुक्त/सहाय्यक पोलीस आयुक्त/वरिष्ठ पोलीस अनियोक्ता, पुणे शहर, ३. जिल्हा प्रसिध्दी अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत्त, पुष्णे-१ यांचेकडे आवश्यक त्या प्रतिदीसाठी ४. व्यवस्थापक, येरवडा मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, पुणे-६ यांचेकडे राजपत्रात प्रसिध्दी देणेसाठी. ५. सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर पोलीस नोटीस प्रसिद्धी देणेसाठी. प्रत कार्यवाहीस्तव सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पो.स्टे. शाखा, पुणे शहर २/- सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर यांनी सदर आदेशाच्या प्रती महत्वाच्या ठिकाणी, सार्वजनिक जागी चिकटवाव्यात तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे किंवा अन्य मागनि प्रक्षेपित करून योग्य ती प्ररिश्दी करावी व त्याबाबत योग्य त्या नोंदी अभिलेखावर ठेवाव्यात. प्रत सविनय सादर, १. मा. अतिरिक्त मुख्य सचिव, गृह (विशेष) मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई २. मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ३. मा.पोलीस आयुक्त व अपर पोलीस महासंचालक, पुणे शहर, ४. मा.आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रत सस्नेह अग्रेषित, १. मा.विभागीय आयुक्त, पुणे विभाग, २. मा.आयुक्त, म.न.पा., पुणे ३. मा. जिल्हा सत्र न्यायाधिश, पुणे. ४. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी




