दिनांक २१/११/२०२५ रोजी ११/०० वा. जयस्तंभ अभिवादन २०२६ चे पुर्वतयारीचे अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे वतीने बैठकीचे आयोजनबाबत…

लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर, हददीतील पुणे अहिल्यानगर रोडवरील पेरणे फाटा, ता. हवेली जि. पुणे. येथील जयस्तंभ येथे लाखो अनुयायी यांचे वतीने १ जानेवारी २०२६ रोजी जयस्तंभास अभिवादनसाठी देशभरातुन सुमारे १० ते १५ लाख अनुयायी येण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाचे वतीने करण्यात येणा-या उपाय योजना संदर्भात माहिती देण्यासाठी तसेच सर्व संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते तसेच अनुयायी यांचेकडुन सुचना जाणुन घेण्यासाठी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली जयस्तंभ अभिवादन २०२६ चे पुर्वतयारी संदर्भात पोलीस प्रशासनाचे वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व संघटना प्रमुख, कार्यकर्ते, पत्रकार बंधु यांनी शुक्रवार दिनांक २१/११/२०२५ रोजी सकाळी ११/०० वा. येरवडा पोलीस स्टेशन, शास्त्रीनगर चौक, येरवडा, पुणे येथे बैठकीकरीता उपस्थित राहणेबाबत आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन श्री. सर्जेराव कुंभार यांनी केले आहे.




