रेकॉर्डवरील तडीपार आरोपीस केले जेरबंद..!

दि.२९/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ चे सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अमंलदार किशोर शिंदे, अमोल काटकर, कैलास लिम्हण, तुषार किंद्रे, योगेश झेंडे असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड, नांदेडसिटी वारजे, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार कैलास लिम्हण यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे गणेश सतिश रणखांब वय ३५ वर्ष, रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे हा त्यांचेकडे अवैधरित्या बेकायदेशिर त्यांचे ताब्यात ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस बाळगलेले असताना त्याला सिंहगड श्रृष्टी जवळ, टि पॉईन्ट चौक, एनडीए खडवासला कडे जाणा-या रोडच्या लगत असलेल्या टपरीजवळ पुणे येथुन सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन योग्य ती कायदेशिर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे- १, पुणे शहर श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार प्रभारी पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, राम राजमाने, सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, मारुती पारधी, अमोल काटकर, कैलास लिम्हण, मोहम्मद शेख, पोलीस शिपाई तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला यांनी केलेली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page