दोन गावठी बनावटीचे कट्टे व काडतुसे जप्त करुन आरोपीस केले जेरबंद..!

दिनांक २६/०५/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे एक इसम अग्नीशस्त्र घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. तात्काळ नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता सदर ठिकाणावरील गुरुदत्त मित्र मंडळाचे मंदीरालगतचे मोकळ्या जागेमध्ये इसम नामे सोहम गोविंद धुमाळ, वय १८ वर्षे ७ महीने, रा. पुण्यनगरी सोसायटी, आयप्पा मंदीराजवळ, कृष्णा इन्क्लेव्ह, वडगाव शेरी, पुणे हा त्याचे ताब्यात १,०१,०००/- रु. किं.चे दोन गावठी बनावटीचे कट्टे व दोन जिवंत काडतुसांसहीत मिळुन आल्याने त्याचेकडुन दोन गावठी बनावटीचा कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असुन, त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१४/२०२६, आर्म अॅक्ट क. ३ (२५) म.पो. अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि स्वप्निल पाटील हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-२ श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास कोडग यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page