दुचाकी लूट प्रकरणाचा उलगडा १ आरोपी व २ विधीसंघर्षित बालके घेतली ताब्यात..!

दि.०८/०४/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्राच्या घरी शेवाळवाडी येथे जात असताना, त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर ट्रिपल सीट बसून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा रस्ता अडवून शिवीगाळ व मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या ताब्यातील अंदाजे रु. १,५०,०००/-रु.किं.ची दुचाकी जबरदस्तीने काढून घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३६६/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०९ (६), ३(५) गुन्हा दाखल होता.

अॅमनोरा व सिझन मॉल परिसरात रात्रीच्या वेळी घडलेल्या दुचाकी लूट प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे श्री. संजय मोगले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार सत्यवान गेंड, दिपक कांबळे, बापू लोणकर, अमित साखरे, महावीर लोंढे व अमोल दणके यांच्या पथकाने सुरू केला. हडपसर तपास पथकाने तपासातील सातत्य, आणि गोपनीय माहिती यांचा अचूक मेळ साधत, पोलीस अंमलदार महावीर लोंढे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शुभम सचिन सोनवणे वय १९ वर्ष रा. मुंढवा पुणे व इतर दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांच्या ताब्यातुन लुटलेली १.५० लाख किं.ची मॅट तसेच गुन्हा करताना वापर केलेली दुचाकी असा एकूण २,५०,२००/-रु. किं.चा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ डॉ राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोनि. (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार संदीप राठोड, दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, अमित साखरे, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे, आकाश धावडे, विजय कानेकर यांनी कामगिरी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page