रस्त्याने जाणा-या जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून लुटणा-या फरार चोरास ताब्यात घेतलेनंतर त्याने खोपोली येथील नगरसेवकाचे खुनाची दिली कबुली..!

दि.१२/१२/२०२५ रोजी मधुबन सोसायटीकडून हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणारे रोडवर टेकडीचे जवळ रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया रामटेकडी हडपसर पुणे येथे चार अनोळखी आरोपीतांनी एका वयोवृध्द इसमाला टेकडीजवळील निर्जन रस्त्यावर चालत जात असताना अडवुन त्यांना हाताने मारहाण करुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन ही जबरदस्तीने ओढुन घेवुन एका मोटारसायकलवरुन तेथुन निघुन गेले होते त्यावरुन वयोवृध्द इसमाने दिलेल्या फिर्यादीवरुन वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५०६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

जेष्ठ नागरीकाला लुटण्याचा प्रकार असल्याने वानवडी पोलीस ठाणेकडील तपासपथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयाचा तपास करुन दाखल गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे उमर नुर खान आणि साहील हबीब फकीर यांना अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयातील सोन्याची चैन व आरोपींनी गुन्हा करणेकामी वापरलेली मोटारसायकल हस्तगत केली होती. सदर गुन्हयातील निष्पन्न मुख्य सुत्रधार आरोपी खालीद खलील कुरेशी, रा. सय्यदनगर हडपसर पुणे हा गुन्हा करुन फरार होता.

Advertisement

दि. ३०/१२/२०२५ रोजी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तपासपथक अधिकारी पोलीस उपनिरिक्षक अल्फाज शेख आणि सहा. पोलीस निरिक्षक उमाकांत महाडिक व स्टाफने पाहीजे आरोपी खालीद खलील कुरेशी, वय २३ वर्षे रा. सय्यदनगर हडपसर पुणे याचा हांडेवाडी पुणे येथुन त्याचा शोध घेवुन, तो तेथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन, तपासी अधिकारी पोउनि अल्फाज शेख यांनी त्यास सदर गुन्हयात अटक करुन, सदर आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत त्याचेकडे कसुन तपास करीत असताना त्याने सांगीतले की, त्याने व पुणे येथील त्याचे दोन मित्र यांनी मिळून सुपारी घेवुन इतर आरोपींचे सोबत खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांना जीवे ठार मारले आहे. अशी कबुली दिली आहे. अशाप्रकारे वानवडी तपासपथकातील पोलीस पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपीची माहीती काढुन त्यास हांडेवाडी येथुन शिताफीने पकडुन वर नमुद जबरी चोरीचे गुन्हयात अटक करुन, त्याचेकडे उत्कृष्टरित्या तपास करुन खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचे खुनाचे गुन्हयातील आरोपीस निष्पन्न केले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख,

महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, विठ्ठल चोरमले, विष्णू सुतार, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद या पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page