अक्षय शिंदे एन्काऊंटरवर खासदार उदयनराजेंची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले…

सातारा : राज्यामध्ये सध्या बदलापूर प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची चर्चा सुरु आहे. बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थींनीवर केलेल्या अत्याचारामुळे त्याला अटक करण्यात आली होती. सर्व लोकांनी नराधमाला चौकामध्ये फाशी द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या शिक्षेनंतर अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणावरुन आता खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारले पाहिजे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. माध्यमांशी बोलत असताना उदयनराजे भोसले यांनी सत्ताधारी असो किंवा विरोधक यांच्या कुटुंबाबरोबर अशी घटना घडली असती तर त्यांनी काय केलं असतं. अशा घटनेमध्ये मी स्वतःला त्या कुटुंबाच्या जागी ठेवून व्यक्त होत असतो. गोळ्या घालून मारणं हे फार सहज झालं. यापेक्षा अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे आणि जनतेने तुडवून अशा लोकांना मारलं पाहिजे, अशी आक्रमक प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.
गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजेत. त्यासाठी कायद्यात बदल करा. बलात्कर केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या, असे उदयनराजे म्हणाले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




