धारदार शस्त्राने गंभीर मारहाण सोशल मीडियावर व्हायरल क्लिप प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यात..!

दि.३०/१०/२०२५ रोजी शिंदेवस्ती, हडपसर, पुणे येथील बॅडमिंटन मैदानाच्या पाठीमागील बाजूस धारदार शस्त्राने केलेल्या गंभीर मारहाणीची घटना घडली होती. फिर्यादी हे झेपटा कंपनीची डिलिव्हरी करत असताना त्यांचे ओळखीचे इसम अभिषेक पाचपवार, इतर साथीदार यांनी त्यांच्या मित्राबाबत चौकशी केली. सदर मित्राबाबत माहिती न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी अभिषेक पाचपवार यांनी धारदार शस्त्र वापरून फिर्यादीच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर व गालावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ९२६/२०२५ भा. न्या. सं. कलम. ११८, ३५२, ३(५) सह आर्म अॅक्ट कलम ४ (२५) गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

सदर घटनेची मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दाखल गुन्ह्यात यापूर्वी सिद्धार्थ सोनकांबळे व इतर दोन विधीसंघर्षीत बालकांना अटक ताब्यात घेण्यात आलेले आहे. मात्र मुख्य आरोपी अभिषेक पाचपवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मांजरी पोलीस स्टेशन श्री. बाबासाहेब निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार निखील पवार, प्रशांत दुधाळ, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांच्या पथकाने कोंबींग ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे अभिषेक गजानन पाचपवार वय १९ वर्षे, रा. म्हसोबा वस्ती, मांजरी, पुणे यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, मांजरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ श्री. डॉ राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांजरी पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. बाबासाहेब निकम, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, अंमलदार प्रदीप सोनवणे, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page