खुनाचा गुन्हा उघड झाल्यानंतर सुमारे २० महिन्यांपासून फरार आरोपीस केले जेरबंद..!

दिनांक ०५ मे २०२४ रोजी उन्नतीनगर, हडपसर येथील कॅनॉलमध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यास तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. पुढील चौकशीत सदर मृत इसमाचे नाव विनोद मधुकर शार्दुल (वय ४५), रा. दिवा ईस्ट असे असल्याचे निष्पन्न झाले.

दिनांक ०४ मे २०२४ रोजी लक्ष्मी कॅनॉल, स्वारगेट येथे मृत इसम व त्याचे ओळखीचे इसम यांच्यात वाद झाला होता. या वादातून दोघांनी संगनमत करून मृत इसमास कॅनॉलमध्ये ढकलून जिवे ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते

Advertisement

सदर गुन्ह्याच्या तपासासाठी, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी वास्तव्यास असलेला लॉज निश्चित करण्यात आला. त्यानुसार पोलीस तपास पथकाने दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी उत्तराखंड राज्यातील हरीद्वार येथे जावून आरोपी हॉटेलबाहेर येताच तात्काळ कारवाई करत आरोपी वैभव मनोज जाधव, वय.२४ वर्षे रा. औरंगाबाद यास ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी ही, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, श्री. डॉ सागर कवडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अतुलकुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनाखाली, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, पोनि. (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, विजय कानेकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, आकाश धावडे, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे व अमोल जाधव यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page