अवैध गांजा विक्री करणा-या आरोपीस केले जेरबंद..!

निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे असल्याने पुणे शहर पोलीस दलाकडून वेळोवळी नाकबंदी, गुन्हेगार चेकींग, अवैध धंद्यावर कारवाई व अशा गस्त व पेट्रोलींग कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. बाबासाहेब निकम मांजरी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतानाच्या दरम्यान नमुद आरोपी हा संशयास्पद हालचाल करीत असताना मिळुन आला असता आरोपी नामे सागर मल्हारी राखपसरे, वय ३४ वर्ष, रा. मांजरी हे यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीताकडे आधिक तपास केला असता त्याचेकडून एकुण ३३,९३०/-रु.कि.चा १ किलो ०५१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. सदरचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर, श्री. सागर कवडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले मॅडम यांचे मागदर्शनाखाली मांजरी पोलीस स्टेशन कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर, श्री. बाबासाहेब निकम यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, अंमलदार प्रदीप सोनवणे, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page