रात्री घरफोडी करणारे अज्ञात आरोपींचा शोध घेवून दोन सराईत आरोपींना केले जेरबंद..!

वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं २८७/२०२६, भा.न्या. सं.२०२३ चेकलम ३०५, ३३१ (३), (४), ३(५) प्रमाणे प्रमाणेदाखल गुन्हयाचा तपास चालू असताना पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे व दिपक कोकरे यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दाखल गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील सराईत आरोपी १) रोहीत हानुमंत राक्षे वय ३२ वर्षे रा.स नं ७० वी १ बी हाउस नं ५२१, टकलेनगर, प्रेमरेसीडंसी, शेवाळवाडी, मांजरी बुद्रुक, पुणे २) मनोज आनंद गायकवाड वय २४ वर्षे, रा. रूम ३, दुसरा मजला, हरगुडे कॅम्पलेक्स, सणसवाडी, ता. हवेली, जि. पुणे. मुळ नंदगाव, ता. मुखेड, जि. नांदेड यांना निष्पन्न करुन त्यांचेकडे मिळून आलेली दुचाकी गाडी हि त्यांनी काळेचा ओढा, वाघोली येथून चोरी केल्याचे सांगितले असून त्याबाबत चोरीचा गुन्हा दाखल आहे. नमुद दोन आरोपींना अटक करुन त्यांचेकडून ५.६ ग्रॅम सोने, ७५.६२ ग्रॅम चांदी, एक दुचाकी, तीन मोबाईल असा २,५०,०००/- रु किं मुद्देमाल जप्त केला असून. नमुद आरोपीकडुन खालील गुन्हे उघकीस आले आहेत वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. २८७/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५, ३३१(३) (४), ३(५) प्रमाणे वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. २९७/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा अधिक पोलीस उपनिरीक्षक तपास मनोज बागल, करित आहेत
सदरची कामगीरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर, श्रीमती, नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पल्लवी मेहेर, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, यांनी केली आहे.




