मोटार सायकल चोरट्यास ०१ तासात केली अटक, चोरीस गेलेली मोटार सायकल केली जप्त..!

बाणेर पोलीस स्टेशन गु.र.नं.२९१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा

दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी यांची फिर्याद की, दि. ०५/१२/२०२५ रोजी ०७/०० वा. ते २०/३० वा.चे दरम्यान साई चौक, बालेवाडी पुणे येथुन फिर्यादी यांचे लातुर स्पेशल निलंगा राईस या राईसच्या दुकानाच्या मागे मोकळ्या जागेत लॉक न करता पार्क केलेली होंडा यूनिकॉर्न दुचाकी क्र एम.एच.१४ बिटी ७३८६ गाडी कोणीतरी अज्ञात इसमाने जाणीवपुर्वक लबाडीच्या उद्देशाने चोरुन नेली अशी फिर्याद दिल्याने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल ही आरोपी नामे. ऋषीकेश नागनाथ सुर्यवंशी, वय २२ वर्षे, रा.६६ अव्हेनिव्ह सोसा. मागे, टकले चौक, पिंपळे निलख, पुणे. याने चोरी केली असल्याचे गुप्त बातमी बाणेर पोलीस स्टेशनचे पोलीस तपास पथकास प्राप्त झाली असता. सदर पोलीस तपास पथकाने आरोपीचा शोध घेवुन आरोपीस केवळ ०१ तासात अटक केली. नमुद आरोपीकडुन गुन्ह्यात चोरी गेलेली मोटार सायकल क्र.एम.एच.१४ बिटी ७३८६ जप्त करण्यात आली.

Advertisement

सदरची कामगिरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती अलका सरग यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक के.बी डाबेराव, सहा. पोलीस निरीक्षक रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रितम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, रोहीत पाथरुट व स्वप्नील मराठे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page