आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई..!

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १४९/२०२४ भा.न्या.सं.क.१०९,१८९(२),१८९(४), १९१(२) (३),१९०,१२६(२),३५२,३५१(३),भारतीय शस्त्र अधि. कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि.कलम ३७ (१) (३), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१), (ii)३(२) ३(४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी व आंदेकर टोळीचा सदस्य आरोपी नामे गणेश उर्फ सुरज अशोक वड़ा, वय ३० वर्ष रा. मंगळवार पेठ पुणे हा मागील दोन वर्षापासून फरार होता. सदर आरोपी हा सध्या मु.पो. कुरता. भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार दिलीप गोरे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत मिळाल्याने जिल्हा कोल्हापुर येथे जावुन सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

66 तसेच दि.१५/१२/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल आव्हाड व पोलीस अंमलदार मयुर भोकरे यांना त्यांचे गोपनीय बतमीदाराकडुन माहिती मिळाली की, आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक रा. नानापेठ पुणे याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आहे. तन्मय कांबळे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याने गावठी पिस्टल हे त्याचा मित्र विधीसंघर्षग्रस्त बालक रा.नानापेठ पुणे याचेकडे ठेवल्याचे सांगुन तो सध्या स.नं. २८, डोके तालीमच्या मागे, नाना पेठ, पुणे येथील बंडु आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर याच्या “ हिच आईची इच्छा” या चार मजली घरामध्ये राहत असल्याचे सांगितले. गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विधीसंघर्षग्रस्त बालक रा. नानापेठ पुणे यास पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेवुन त्याचेकडे विश्वासात घेवुन चौकशी करीता त्याचे ताब्यातील होडा अॅक्टीव्हा मोपेड स्कुटरचे डिकीत ८०,०००/- रु.कि.चे ०२ गावठी बनावटीचे पिस्टल, २०००/-रु.कि.एक लोखंडी धारदार कुकरी, १५,०००/- रु.कि.एक काळया रंगाचे एअर पिस्टल, ४०,०००/- रु.कि.एक होडा अॅक्टीव्हा मोपेड स्कुटर व इतर ऐवज असा एकुण १,३७,५००/- रु.चा. मुद्देमाल मिळुन आला.

Advertisement

तसेच विधीसंघर्षग्रस्त बालक रा. नानापेठ पुणे याचे राहत असलेल्या बंडु आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर याच्या “ हिच आईची इच्छा” राहते घराची पंचासमक्ष झडती घेतली असता १८,८४,३८९/- रु.किं.चे चांदीचे दागिने, ००/- रु.कि.चे सुर्यकांत आंदेकर, वनराज आंदेकर, कृष्णराज आंदेकर यांचे नावे असलेले आयकर विवरण कागदपत्रे, ००/- रु.कि.चे जमिनीच्या व दुकानाच्या संदर्भातील करार नामे, ००/- रु.कि.चे वनराज असोसिएटस प्रमोटर्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या भागीदारी संदर्भातील कागदपत्रे, ००/- रु.कि.चे महेश महिला नागरी सहकारी पतसंस्था यामध्ये ठेवी ठेवलेल्याच्या पावत्या, ००/- रु.कि.चे एक १०० रु.चा स्टॅम्प २०० ग्रॅम सोने तयार करावयाचा करारनाम्याची प्रत. ००/- रु.कि.चे महारेरा व इतर मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे १७,१५,२६०/-रुपये रोख रक्कम व इतर मुद्देमाल १०,८००/- असा एकुण ३६,६७,९४९/- रु. कि. मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एक आरोपी अटक करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री.अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. विजय कुंभार, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-३ श्री. शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक १ व २ तसेच युनिट -०१ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक आश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहा. पो. निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उप- निरीक्षक गौरव देव, पोउपनि राम पारवे, पोउपनि राहुल मखरे व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page