चुकीने दुस-याचे खात्यावर गेलेले ७५,०००/- रुपये अवघ्या १० मिनीटात फिर्यादीस केले परत..!

दिनांक १६/०५/२०२५ रोजी इसम फिर्यादी यांनी समक्ष भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे येवुन कळविले की, त्यांचे वडीलांनी सकाळी ०८.४५ वा चे सुमारास ७५,०००/- रुपये घाईबडीत आंध्रप्रदेश येथील इसमाचे नंबरवर चुकीने पाठविले गेले आहेत. सदरचा इसम हा त्यांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहे अशी माहीती कळविली.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तात्काळ सदर इसमाचे तक्रारीची दखल घेवुन पोलीस अंमलदार राहुल बांडे व दिपक शेंडे यांना सदर इसमास त्याची रक्कम परत मिळवुन देणेबाबतचे मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस अंमलदार राहुल बांडे व दिपक शेंडे यांनी तात्काळ आंध्रप्रदेश येथील इसमाची संपर्क करुन त्यास पोलीस असल्याची व्हाट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे खात्री करुन देवुन त्यांचेकडून दहा मिनिटांमध्ये ७५ हजार रुपये तक्रारदार यांना परत मिळवून दिले आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस अंमलदार राहुल बांडे व दिपक शेंडे यांनी केली आहे.




