बाहेर जिल्हयातील वाहन चोरी करणारे सराईत आरोपींकडून तीन गुन्हे उघडकीस आणुन दोन सराईत आरोपी केले जेरबंद..!

दिनांक ०५/१२/२०२५ रोजी रात्री ०१/०० वा.चे सुमा. साई सत्यम पार्क, लेन नं. ३, वाघोली येथून यातील फिर्यादी यांची रॉयलइन फिल्ड बुलेट गाडी पार्किंग मधुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केली म्हणून वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं.६९६/२०२५ बी.एन.एस.क.३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असताना त्याचा तपास तपास पथक पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे व सुनिल कुसाळकर यांनी वाघोली ते शेवगाव नेवासा रोड असे एकूण १७० ठिकाणाचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासून आरोपीची शोध घेतला असता सराईत गुन्हेगार नामे १) रामेश्वर अंकूश धनगर वय २८ वर्षे, रा. गणेशनगर, पैठण, जि.छ. संभाजीनगर, २) आजीनाथ संभाजी माळी, वय २२ वर्षे, रा. सोनी सांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर हे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून चोरीस गेलेली रॉयलइन फिल्ड बुलेट गाडी व इतर गुन्हयातील दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे गुन्हे उघकीस आले आहेत.

१.

२.

Advertisement

वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९६/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३(२)

रांजनगांव एम.आय.डी.सी. पो.स्टे. पुणे ग्रामीण गु.र.नं. ८१/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२)

३. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.३१७/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२)

यातील आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून रॉयलइन फिल्ड बुलेट गाडी व दोन दुचाकीसह एकूण १,००,०००/- रु.किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर श्री. नूतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. युवराज हांडे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरी. मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ व शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page