सहकारनगर पोलीस स्टेशनकडील पाहिजे असलेले ०२ आरोपी केले जेरबंद..!

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके व पाटील यांना त्यांचे गोपनीया बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एका इसमाकडे सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड गाडी असून सदरची गाडी ही चोरीची असून तो, कुटुंब सोसायटी, आंबेगाव पठार, कात्रज पुणे या सोसायटीचे पार्कीगमध्ये थांबलेला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी जावुन पाहणी केली असता नमुद वर्णनाचा इसम सदर ठिकाणी मिळुन आल्याने सदर इसमास ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव चेतन राजु जाधव, वय २५ वर्षे, रा.ए/५०७, कुटुंब सोसायटी, स.नं. १६, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे असे सांगितले. सदर आरोपीकडे आधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार यांनी मिळून धनकवडी स्मशानभुमीचे परिसरातुन सदरची मोपेड गाडी चोरी केल्याचे कबुल केले. सदर मोपेड गाडी बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७१/२०२५, भा.न्या.सं.क. ३१० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Advertisement

सदर गुन्हयातील ४०,०००/- रु. किं. ची ब्ल्यु रंगाची सुझुकी कंपनीची बर्गमॅन मोपेड गाडी व

सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे चेतन राजु जाधव, वय २५ वर्षे, रा. ए/५०७, कुटुंब सोसायटी, स.नं. १६, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे. (अटक) व विधीसंघर्षित बालक (ताब्यात) घेवुन पुढील तपासकामी सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, श्री. दत्ताराम बागवे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, अजित शिंदे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके,

महेश पाटील व चालक नारायण बनकर यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page