मोक्कातील फरार आरोपीसह वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक; सिंहगड रोड पोलीसांची कारवाई

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्गेगारीच्या घटना उघडकीस येत आहे. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातचं आता खुनाचा प्रयत्न तसेच मोक्कातील फरार असलेल्या व इतर तीन गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश आले आहे.

रवी मधुकर जाधव (वय २६, रा. संजीवन हेरिटेज, जाधवनगर, वडगाव) आणि त्याचा साथीदार आश्विन ऊर्फ बारक्या बाळकृष्ण लोणारे (वय २०, रा. धायरी गाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात रवि जाधव हा फरार होता. तसेच त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून तो फरार होता.

Advertisement

सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे तपास पथक त्याचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना बातमी मिळाली की, पोलिसांना गुंगारा देणारा रवि जाधव हा पठारवाडी, शिंदेवाडी येथील चर्तु:मुख महादेव मंदिराजवळील डोंगरावर लपून बसला आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व सहकारी यांनी मंदिर परिसरातील डोंगराळ भागात शोध घेऊन रवि जाधव याला पकडले. त्याच्याबरोबर असलेल्या आश्विन ऊर्फ बारक्या लोणारे यालाही ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्धही सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न तसेच वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न या दोन गुन्ह्यामध्ये आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. रवि जाधव याला मोक्का कायद्याअंतर्गत गुन्ह्यात अटक केली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, संतोष भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, पंकज देशमुख, अमोल पाटील, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, विकास पांडुळे, विकास बांदल यांनी केली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page