दोन आरोपींना शिवाजीनगर कोर्टाने प्रथमच community services शिक्षा सुनावली..!

- दि.०२/१२/२०२५ रोजी २१/१५ वा.चे सुमा. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अंमलदार मखरे व तायडे गस्त करीत असताना पुणे महानगरपालिका बिल्डींगचे पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी आरोपी नामे विनोद वसंत माकोडे, वय ३२ वर्षे, रा. सांगवी खुर्द, अकोला व आरोपी नामे सागर रामकृष्ण बोदाडे, वय ३६ वर्षे, रा. सदर हे नशापाणी करुन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करताना मिळुन आल्याने त्यांचे विरोधात पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरुन १) अदखलपात्र गु.र.नं.३५३/२०२५ भा. न्या. सं. कलम ३५५ व २) अदखलपात्र गु.र.नं. ३५४/२०२५ भा. न्या. सं. कलम ३५५ अन्वये दि.०३/१२/२०२५ रोजी गुन्हे दाखल आहेत.
- सदर दाखल गुन्ह्यांमधील आरोपी नामे विनोद वसंत माकोडे याचे विरुध्द खटला क्र.१९९०२७/२०२५ व आरोपी नामे सागर रामकृष्ण बोदाडे याचे विरुध्द खटला क्र.१९९०१७/२०२५ अन्वये मा. न्यायालयात दाखल केला असता नमुद आरोपींनी गुन्हा कबुल केल्याने मा.श्री. विक्रमसिंह भंडारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर कोर्ट, पुणे यांनी ४ दिवस दररोज ३ तासाची सामुदायिक सेवा (community services) पोलीस स्टेशन अंमलदार शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे देखरेखीखाली पार पाडावी अशी शिक्षा दिलेली आहे. सदरची शिक्षा ही महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४-क दिनांक २८/११/२०२५ अन्वये देण्यात आली आहे.
- सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर. श्री. साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. महेश बोळकोटगी, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. धनंजय पिंगळे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, मखरे, तायडे व कोर्ट अंमलदार कांबळे यांनी केली आहे
Advertisement




