गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड आरोपीकडुन केले जप्त..!

दिनांक ०८/०१/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवले पुलाकडुन कात्रज कडे येणारे मुख्य रोडचे दरम्यान असलेल्या राजमाता उदयानासमोरील बाजुचे सव्हीस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबला आहे. लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नामे अभिषेक कैलास दांगट, वय १९ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ५०७, वृंदावन विश्व, तानाजी नवले इंडस्ट्रीज नहि रोड, पुणे हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रु.किं.चे एक गावठी बनावटीचा कट्ट व एक जिवंत राऊंडसहीत दिनांक ०८/०१/२०२६ रोजी १२/०५ वा. मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत राऊंड जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ०३/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी, मा अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्री. मिलींद मोहीते मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अण्णा दराडे, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.




