चैन स्नॅचींगचे ५ गुन्हे उघडकीस आणुन ०७,०४,०००/-रू. किं.चा मुद्देमाल केला हस्तगत..!

गेल्या काही महिन्यांपासून हडपसर व आसपासच्या परिसरात चैन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. विशेषतः संध्याकाळी महिलांना लक्ष करून गर्दिच्या ठिकाणी चैन चोरी करण्यात येत होती. या वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, यांनी देखील हडपसर पोलीस ठाण्यात बैठक घेवून संबधित अधिका-यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

या सूचनांनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती अश्विनी जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केला. तपासातून असे दिसून आले की, चैन स्नॅचिंगचे गुन्हे हे रात्री १९/३० वा ते २१/३० वा. चे दरम्यान पुणे सोलापूर रोडवरील गर्दीच्या ठिकाणी जसे शेवाळवाडी येथील भाजी मार्केट, महादेव मंदिर, गाडीतळ, हडपसर, मांजरी येथील गर्दीच्या ठिकाणी झाले असल्याचे दिसून आले. नमुद परिसरात खरेदीसाठी विशेषतः महिलांची गर्दी असते. तसेच गुन्हा झाल्यानंतर पुणे सोलापूर हायवेने पसार होण्याची सोय असल्याने आरोपींना हा भाग निवडल्याचे निष्पन्न झाले.

दि.१८/०८/२०२५ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार महावीर लोंढे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी नामे १) अनिकेत विजय चव्हाण वय २४ वर्षे रा. सज्जनगड कामधेनु इस्टेट हडपसर गाव पुणे २) ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण वय २३ वर्षे रा. खुणेश्वर ता. मोहोळ जि. सोलापुर यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे केले कौशल्यपुर्ण व सखोल तपासात त्यांनी वेळोवेळी हडपसर परिसरात चैन चौरी केली असल्याची कबुली दिली. नमुद आरोपी यांना हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५११/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३ (५) या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदर आरोपींनी यापुर्वी १) हडपसर पोलीस ठाणे गु.र. नं ४५६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५) २) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४९४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (६), ३(५) ३) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४९८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३(५) ४) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५११/२०२५ भा.न्या.सं. कलम

३०४(२), ३(५) ५) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ६५९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३(५) असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असुन सदरचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

सदर आरोपींकडून ४,५४,०००/-रु.किं. चे ४५.५४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्हा करताना वापर केलेल्या होंडा युनिकॉर्न, हिरो एक्सट्रीम, बनावट नंबर प्लेट, स्कु ड्रायवर, मास्क, काळ्या रंगाची सेंक असा एकुण ७,०४,६००/-रु. किं. मुद्देमाल माल जप्त करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण याच्यावर यापुर्वी हडपसर, वानवडी, सिंहगड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ, समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचीगचे १६ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुण श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page