डॉक्टर असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने वाचवले मुलाचे प्राण…

पुणे- सुरक्षा अन् उपचारही अस दोन्ही कर्तव्य बजावत एका डॉक्टर असलेल्या आयपीएस पोलीस अधिकाऱ्याने फिट येऊन रस्त्यावर पडलेल्या अधिकाऱ्याने मुलाचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कार्याने सर्वांची मने जिंकली असूनझ त्यांचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे.

Advertisement

पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
नागरिकांना घालून देताना आयुष्यापेक्षा काही मोठे नसते असे आपल्या कार्यातून सुचित केले आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उपायुक्त संदीप भाजीभाकरे हे कर्तव्यावर चालले असताना त्यांना वानवडी परिसरातील जगताप चौकात अपघात झाल्याचे दिसले. एका तरूणाने एका आजीला दुचाकीची धडक दिली. यावेळी आजींना रक्तस्त्राव होत असतानाही त्यांना दिसले. त्यांनी त्याच्या खिशातील रूमाल काढून आजींच्या जखमेवर बांधला. मात्र, लागलीच त्यांचे त्या तरूणाकडे गेले. तरूणाला फिट आल्यानेच त्याच्याकडून हा अपघात घडल्याचे त्यांना लक्षात आले. फिट आल्यामुळे त्या तरूणाचा जबडा जाम झाला होता. त्यांनी आपले वैद्यकीय कौशल्य वापरून तरूणाला पुन्हा शुध्दीवर आणले. त्यांनी समय सुचकता दाखवून तरूणाचे प्राण वाचविले. त्यांना एका गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढे जायचे असल्याने त्यांनी आपल्या पोलिस दलातील सहकार्यांना बोलवून तरूणाला रूग्णालयात दाखल करून त्याच्या घरच्यांना कळविण्यास सांगितले.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page