अजित पवार गटाला मोठा धक्का! भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश

गडचिरोली – आगामी विधानसभा निवडणूक काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याआधी विविध नेते आपल्याला उमेदवारी कोणत्या पक्षातून मिळेल याची चाचपणी करुन पक्ष प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठी स्पेस निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाने भाजपला अनेक मतदारसंघात धक्का दिला आहे. यानंतर विदर्भात अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार भुसारा, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, गडचिरोली जिल्हाध्यक्ष पवार यांची उपस्थितीती होती.

Advertisement

भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी धमकी दिली होती. जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असा सवाल करत शरद पवार गटातून आपलीच मुलगी आपल्याविरोधात उभी राहणार असल्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले होते. यामुळे विधानसभेला वडील विरुद्ध मुलगी अशी लढाई रंगणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page