बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? वाचा हवामान खात्याचा अंदाज

पुणे : राज्यात गणेशोत्सव जोरात सुरू आहे आणि पावसानं काहीसा विश्रांती घेतल्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी पहायला मिळत आहे. मागील आठवड्यात काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अनुभव घेण्यात आला, तर काही ठिकाणी पावसानं ब्रेक घेतला आहे. आता प्रश्न आहे: गणेश विसर्जनाच्या दिवशी पावसाची हजेरी राहणार का? जाणून घेऊयात.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी X माध्यमावर विसर्जनाला राज्यात काय स्थिती असेल यावर प्रकाश टाकला आहे. यानुसार सिंधुदुर्ग- गोवा व पूर्व विदर्भा काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता आहे.

Advertisement

हवामाान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात अजुनतरी कुठेही अलर्ट देण्यात आला नाही. मात्र, मराठवाडा, विदर्भ खान्देशातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पावसाची हजेरी राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. सिंधुदुर्ग-गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.उर्वरित मुंबई, ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page