वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाकडून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून सुमारे 5,87,050/- रुपये किंमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे दागिने हस्तगत केले बाबत…

काल दिनांक 27/08/2025 रोजी फिर्यादी नामे श्री सतीश द्वारकानाथ मकाशीर वय 78, रा. या/103, ला क्रेस्ता, सोपान बाग, घोरपडी, पुणे यांनी फिर्यादी दिली की, दि. 21/08/2025 रोजीचे 12.00 ते दि . 27/08/2025 चे 13.00 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे राहते घरातून 5,87,050/- रुपये किंमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पो. स्टे. गु. र न 341/2025, भारतीय न्याय संहिता कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळवून एक संशयित महिला नामे श्रीमती सुधा राजेश चौगुले, वय 35, व्यवसाय घरकाम, रा. बोराटे वस्ती, बी टी कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांचेकडून खालील नमूद मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
१) २,१२,०००/- रु. किं. च्या दोन सोन्याच्या बांगड्या त्यांचे वजन २६.५८० ग्रॅम इतके असलेले जु. वा. किं.अं.
२) ५०,०००/- रु. किं.ची एक सोन्याची अंगठी तिचेवरती हि-याचे खडे असलेली, अंदाजे ४ ग्रॅम वजनाची असलेली जु. वा. किं.अं.
३) ५०,०००/-रु. किं.ची एक सोन्याची अंगठी तिचेवरती पुखराज खडा असलेली अंदाजे ५ ग्रॅम वजनाची असलेली जु. वा. किं.अं.
४) ४८,०००/- रु. किं. चे एक जोडी सोन्याचे कानातले चौकानासारखी डिझाईन असलेले, अंदाजे ६ ग्रॅम वजनाचे असलेले जु. वा. कि. अं.
५) ३२,०००/-रु. किं. चे एक जोडी सोन्याचे कानातले स्टारसारखी डिझाईन असलेले, अंदाजे ४ ग्रॅम वजनाचे असलेले जु.वा.कि.अं.
६) ८०,००० /- रु. किं. चे एक जोडी सोन्याचे व हि-यांचे कानातले त्यांचे वजन ४.३६० ग्रॅम इतके असलेले जु. वा. किं.अं.
७) ३०,०००/-रु. किं. च्या सोने व हि-यांच्या कानातील एक जोडी कुड्या त्यांचे वजन अंदाजे ३ ग्रॅम इतके असलेले जु. वा. कि.अं.
८) ५,००० /- रु. किं. चे १४ कॅरेटचे अंदाजे ३ ग्रॅम वजनाचे एक जोडी सोन्याचे कानातले त्यामध्ये लाल खडा असलेले जु. वा. किं.अं.
९) ३०,०००/-रु. किं चे एक जोडी सोन्याचे कानातले त्यामध्ये खरे मोती असुन त अंदाजे ३ ग्रॅम वजनाचे असलेले जु. वा. कि.अं.
१०) २०००/-रु. किं. चे एक जोडी सोन्याचा मुलामा असलेले कानातले, अंदाजे ४ ग्रॅम वजनाचे असलेले जु.वा. किं.अं.
११) ४८,०००/-रु. किं. चे एक जोडी सोन्याचे कानातले फुलासारखी डिझाईन असलेले, अंदाजे ६ ग्रॅम वजनाचे असलेले जु.वा.कि.अं.
१२) ५०/- रु. किं. ची एक निळया रंगाची पिंक झीप असलेली छोटी पर्स जु.वा. किं.अं.
एकुण *५,८७,०५०/-रुपये
सदरची कामगिरी श्री. मनोज पाटील,अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. डॉ.राजकुमार शिंदे सो, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 5, श्री. धन्यकुमार गोडसे सो, सहाय्यक पोलिस आयुक्त, खडकी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सत्यजित आदमाने, श्री.राजकुमार डोके पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकाचे सपोनि उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाने,अमोल गायकवाड, अभी चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, यतीन भोसले,आशिष कांबळे, अर्शद सय्यद यांनी केली आहे.
माहितीस्तव सादर
सत्यजित आदमाने
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वानवडी पोलीस स्टेशन
पुणे शहर




