परिमंडळ ६ मधील लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या गुन्हेगारास वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा…!

थोडक्यात हकिकत :-
सदर घटना ही जानेवारी २०२० ते दिनांक १४/११/२०२० रोजीचे दरम्यान आरोपीचे राहते घरी घडली आहे. यातील आरोपी सुनिल कोंडीवा जेधे, वय ४६ वर्षे, रा. मु.पो. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे याने पिडीत अल्पवयीन निर्भया हीस ड्रेस खरेदी करुन देण्याच्या बहाण्याने उरुळी देवाची येथील लॉजवर घेऊन जाऊन ती अल्पनवयीन असल्याची जाणीव असताना तिच्यासोवत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला आहे. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ८८३/२०२० भा.दं.वि. कलम ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (एन),३७६ (३), ५०६ सह वालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ३,४(२),५ (एल),५ (एन), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास :-
सदर गुन्हयाचा तपास श्री. व्हि.पी. झिंजुकें, पोलीस उप निरीक्षक, तत्का. नेमणूक लोणी काळभोर पोलीस ठाणे सध्या नेमणूक गांधीनगर पोलीस ठाणे, कोल्हापूर यांनी केला व यातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा स्पेशल सेशन केस क्र. ७०/२०२१ असा आहे.
शिक्षा :-
वरील प्रकरणामध्ये सवळ साक्षीपुराव्याअंती मा. अतिरीक्त सत्र न्यायाधीश, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपी सुनिल कोंडीवा जेधे यास दिनांक ११/०४/२०२६ रोजी २० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
कामगिरी :-
सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती अरुंधती ब्रम्हे, कोर्ट पैरवी पोउनि श्रीमती रुपाली जाधव, मपोहवा श्रीमती अश्विनी पवार यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोउनि श्रीमती रुपाली जाधव, मपोहवा श्रीमती अश्विनी पवार व नमूद गुन्हयाच्या तपासी अधिकारी पोउनि श्री. व्हि.पी. झिंजुर्के यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.
सोवत – कोर्ट आदेश




