धमकी देऊन खंडणी मागणारे आरोपींना केले जेरबंद..!

दि.१२/०८/२०२५ रोजी लष्कर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४४/२०२५, भा.न्या.सं.क. ३०८ (३),३०८(४),३५२, ३५१ (३), ३५१ (४),६१ या गुन्हयात, दि.२८/०७/२०२५, दि.०४/०८/२०२५, दि.०९/०८/२०२५ व दि.११/०८/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांचे ऑफिस मध्ये असताना त्यांना बांधकामाचे व्यवहाराबाबत रोहन गवारे व त्याचा साथिदार यांचे सांगण्यावरुन सुदर्शन गायके यांनी ते अरुण गवळीचा पी.ए बोलतायत अशी बतावणी करुन संगनमताने कट रचुन धमकी देवुन फिर्यादी यांना ५ कोटी रुपयाची खंडणीची मागणी केली. म्हणुन फिर्यादीने १) रोहन शिवाजी गवारे २) सुदर्शन आसमानराव गायके ३) महेंद्र रामनाथ शेळके ४) कृष्णा परमेश्वर बुधनर व इतर एक इसम यांनी संगणमताने कट रचुन फोनव्दारे व प्रत्यक्ष खंडणीची मागणी करुन पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्हयाच्या तपास करताना खंडणी विरोधी पथक १ मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच लष्कर पोलिस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेवुन यातील आरोपी नामे १) रोहन शिवाजी गवारे वय ३० वर्षे रा. शितल अपार्टमेंट लेन नं.५, कवडेवाडी, कोरेगाव पार्क पुणे २) सुदर्शन आसमानराव गायके वय २७ वर्षे रा. महादेव मंदिरासमोर आईजी निवास इमारत, महानगर-१, वाळुंज संभाजीनगर ३) महेंद्र रामनाथ शेळके वय ४२ वर्षे रा. कॅनॉल रोड सुर्या लॉन्स शेळके निवास, शाहुनाथनगर, बीड ४) कृष्णा परमेश्वर बुधनर वय २६ वर्षे रा. हनुमान मंदिर जवळ, खामगाव ता.जि. बीड यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलिस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.२ पुणे शहर, श्री. मिलिंद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ पुणे श्री. राजेंद्र मुळीक मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे, श्रीमती संगिता अल्फोन्सो शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार तसेच तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, पोलीस उप-निरिक्षक राहुल घाडगे व पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, प्रविण गायकवाड, प्रमोद गायकवाड, अमोल चव्हाण, लोकेश कदम, सागर हराळ व अमोल कोडीलकर, तसेच खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरिक्षक श्री. शैलेश संखे, युनिट ४ चे पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे सहा. पोलीस निरिक्षक राजेश माळेगावे, पोलीस उप-निरिक्षक राजेश्वर पारवे, पोलीस उप-निरीक्षक वैभव मगदुम व पोलीस अंमलदार प्रविण वसंत ढमाळ, रणजित बाळकृष्ण फडतरे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, बालारफि शेख, रहिम शेख, मयुर भोकरे, मंगेश गुंड, नितीन बोराटे, विनोद महाजन, तुषार खाडे, हरिष मोरे, नागेश कुवर, प्रविण भालचिम व संजय अढारी यांनी संयुक्त कारवाई केली आहे.




