मोठी बातमी! प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य वाडेकर महाराजांना अटक

पुणे : प्रसिद्ध किर्तनकार आणि सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असणारे तथा रील्स स्टार चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज) यांना पिंपरी – चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य महाराज यांनी त्यांच्या इतर दोन भावांसह आणि इतर साथीदारांसह घराच्या जवळ असणारा रस्ता JCB ने बेकायदेशीरपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे परिसरामध्ये चैतन्य महाराज वाडेकर हे राहतात. त्यांच्या घराजवळ एक कंपनी आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांचे वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता बेकायदेशीर खोदला. यावेळी त्यांचे इतर एक नातेवाईक आणि दोन बंधू होते. असं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच कंपनीच्या कंपाउंडचे पत्रे देखील काढले आहेत. अखेर या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली आहे. चैतन्य महाराज वाडेकर हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. ते रिल्स देखील बनवतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यांच्या या अटकेमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page