पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुचं; मुंढव्यातील ज्येष्ठ महिलेचे घर फोडून तब्बल ‘इतक्या’ ऐवज लंपास

पुणे : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुचं आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता मुंढवा भागात ज्येष्ठ महिलेचे घर फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ७८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

तक्रारदार या सह्याद्री पार्क येथील रोशन व्हिला येथे राहण्यास आहेत. दरम्यान, त्या १८ सप्टेंबर रोजी काही कामानिमित्त दुपारी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील रोकड व दागिने असा २ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. तक्रारदार या दुसऱ्या दिवशी म्हणजे, १९ सप्टेंबर रोजी परत आल्या असता ही घटना उघडकीस आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page