पुणे रेल्वे स्थानकातून ७ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण, दोघांना अटक

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सात महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेत अपहृत बालकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबाबत बालकाची आई पूजा संतोष दास (वय २८, रा. झारखंड) यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी मोहम्मद खान कुरेशी (वय-२७), नजमा अक्रम खान कुरेशी (वय-२५) यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे रेल्वे स्थानकातून १७ सप्टेंबर रोजी पूजा दास नातेवाईकांसोबत झारखंडला निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर सात महिन्यांचा मुलगा होता. रेल्वे स्थानकाच्या आवारात आरोपी मोहम्मद आणि नजमा यांनी पूजाशी ओळख केली. त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांच्या ताब्यातून नजमाने मुलाला घेतले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून मोहम्मद आणि नजमा पसार झाले. गणेश विसर्जनाच्या रेल्वे स्थानकाच्या आवारातून बालकाचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. मुलाचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपासात पसार झालेले आरोपी अहमदाबादमधील उनावा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथक अहमदाबादला रवाना झाले. पोलिसांनी नजमा व मोहम्मद यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बालकाची सुखरुप सुटका केली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




