५० लाखाची खंडणी मागणा-या इसमास १२ तासाच्या आत केले जेरबंद..!

दिनांक २६/०७/२०२५ रोजी ते दिनांक २९/०७/२०२५ रोजी पर्यत एका इसमाने यातील फिर्यादी यांना व्हॉटसअॅप नंबरवर अनोळखी मोबाईल नंबर वरुन कॉल करुन, “तुमने बहुत पैसा कमाया है, मुझे ५० लाख रुपये खंडणी चाहीये, नही तो मै तुम्हारा मर्डर करुगा” असे वेळोवेळी व्हॉटसअॅप कॉलवरुन फिर्यादी यांना धमकी देवुन फिर्यादी यांचेवर पाळत ठेवत असल्याबाबत मुंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २०८/२०२५ भा.न्या.सं.क.३०८ (२), ३०८ (३) गुन्हया दाखल करण्यात आला आहे.

सदर तक्रारीची पोलीसांनी तात्काळ दखल घेवुन, दिनांक २९/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तपास पथक प्रमुख सपोनि राजु महानोर व पथकातील पोलीस अंमलदार यांनी व्हॉटसअॅप कॉल करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेतला असता तो गुन्हा केल्या पासुन त्याचे फोन बंद करुन फरार झाल्याचे तपासामध्ये आढळुन आले. त्यावरुन गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि राजु महानोर व त्याचे पथकाने अनोळखी खंडणी मागणा-या मोबाईल धारक फिर्यादी यांना घोरपडी येथे भेटण्यासाठी येणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार अक्षय धुमाळ व स्वप्नील रासकर यांना मिळाल्याने त्यास सापळा रचुन इसम नामे अनिकेत अनिल पावल वय २४ वर्षे रा. भिमनगर, बिलाल मस्जिदशेजारी, घोरपडी, पुणे यास दिनांक ३०/०७/२०२५ सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि. ५, पुणे हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उद्द्मले यांचे अधिपत्याखाली, मुंढवा पोलीस स्टेशन कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती माया देवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण, सहा. पोलीस फौजदार राजु कदम, पोलीस अंमलदार विनोद सांळुके, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, राहुल मोरे, शिवाजी धांडे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडेकर, योगेश राऊत यांचे पथकाने केली. आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज शहर श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page