शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण..!

शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण
शासनाच्या एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत आज इंडियन एज्युकेशन सोसायटीचे श्री शिवछत्रपती प्राथमिक विद्यालय कोंढवा बुद्रुक पुणे या शाळेच्या वतीने येवलेवाडी येथील डोंगरावर वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न झाला
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक सन्माननीय रमेशजी गायकवाड साहेब, शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सन्माननीय सौ. शोभा खाटपे मॅडम, संस्थेचे खजिनदार सन्माननीय नानासाहेब मोहिते, शाळेच्या इको क्लबच्या उपक्रम प्रमुख सौ. मनीषा जाधव, संस्थेचे समन्वयक श्री. विकास थिटे, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. साधना वाघमारे, श्री. संदीप खांबे, सौ.जयश्री तावडे, श्री.संजय घोडके, श्री.अनंता मुकणे, सौ.रेखा सत्रे, श्रीम. संगीता खोड, श्री. अजित हेरकळ, श्री. सचिन वैरागकर, सौ. आशा वाघमारे श्री. घनश्याम शिंदे, श्री. सागर बगाड, श्रीम. उषा गोरे, सौ. मंजुळा गायकवाड इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर तसेच इ. 1 ली ते 7 वी चे विद्यार्थी आणि आई पालक उपस्थित होते
*यावेळी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी गायकवाड साहेब यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, वृक्ष हे काळाची गरज असून आपण केवळ वृक्षारोपण न करता या सर्व झाडांची वेळोवेळी काळजी घेऊन ती जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे. हे वृक्ष आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात. निसर्ग आपली काळजी घेतो. त्यामुळे आपणही त्यांची लहान मुलांप्रमाणे काळजी घ्यायला हवी. यावेळी पाठ्यक्रमातील कविता, वृक्ष प्रतिज्ञा घेऊन सर्वांनी वृक्षारोपणास सुरुवात केली यावेळी सर्व विद्यार्थी, माता पालक, शिक्षक यांनी आंबा, चिंच, कडूनिंब, पिंपळ, वड, जांभूळ या विविध प्रकारची देशी 200 झाडे लावण्यात आली
सदरील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी संस्थेस व विद्यालयास युवा उद्योजक श्री गोरख भाऊ दिवेकर व श्री. कैलास बापू कामठे पाटील, श्री. अनिल देवकाते, श्री. विष्णू देवगिरीकर यांनी विशेष सहकार्य केले त्यांचेही संस्थेच्या वतीने हार्दिक आभार




