अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा; प्रियकराच्या मदतीने केला खून

पुणे : पुण्यात खून, दरोडे, बलात्कार या सारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शनिवारी अशीच एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने मुलींसमोरच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच उघड झालं आहे. यानंतर घरात चोरी झाल्याचा बनाव रचत पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला. आरोपी पत्नीला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातल्या कर्वेनगर परिसरात श्रीमान सोसायटीत शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.
राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२) असे खून झालेल्याचे नाव आहे. राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुली आहेत. वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास निवंगुणे यांच्या घराचा दरवाजा अज्ञात व्यक्तींनी वाजविला. निवंगुणे यांनी घराचे दार उघडले. त्याच वेळी बाहेर उभ्या असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, राहुल यांनी आरडाओरडा सुरू केला. जिवाच्या आकांताने ते ओरडत होते. त्यावेळी त्यांच्या तीन मुली आणि पत्नी जागी झाली. दरम्यान, आरोपींनी घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तुची लुट केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
आरोपींच्या तोंडावर कापड बांधलेले होते. डोळ्यांदेखत वडिलांची हत्या झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्या बोलण्याचा मनस्थीतीत नव्हत्या. पोलिसांना या प्रकरणात संशय वाटला. त्यामुळे पोलिसांनी पत्नीकडे कसून तपासाला सुरुवात केली. तिच्याकडे केलेल्या चौकशीत संशय अधिक बळावला. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात अखेर या खुनाचा छडा लावला. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून घडवल्याचे समोर आले. पतीला तिचे अनैतिक संबंध समजले होते. या अनैतिक संबंधात तो अडथळा ठरत असल्याने पतीचा काटा काढण्यात आला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




