काळेपडळ पोलिसांची अजून एक धडाकेबाज कारवाई..!

काळेपडळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैद्य धंदे, अभिलेखावरील आरोपीत इसम, सराईत गुन्हेगार यांना चेक करणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशित केले होते. त्याअनुषंगाने तपास पथकाचे अंमलदार पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हांडेवाडी परिसरामध्ये एक इसम हा घरगुती गॅस मधून, व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस ट्रान्सफर करत आहे. सदर बातमी ही पडताळुन पाहीली असता, काव्या मल्टी सर्व्हसेस या दुकानाच्या बाजुलाच लागुन मारूती सुझुकी कंपनीचा एक सुपर कॅरी टॅम्पो क्रमांक एम.एच.१४ केजे ७९१७ या मध्ये घरगुती वापराच्या व व्यावसायिक टाक्या ठेवलेल्या दिसून आल्या. तसेच काव्या मल्टी सर्व्हसेस या दुकानामध्ये आतील बाजुस जावून पाहीले असता, दुकानामध्ये एक इसम हा मानवी जिवीतास धोका उत्पन्न होईल असे घरगुती गॅसच्या टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये तसेच ५ किलोच्या गॅस टाक्यांमध्ये गॅस ट्रान्सफर करीत असल्याचे मिळुन आला. तरी सदर इसमांस ताब्यात घेवून त्यांस त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव नितीन हनुमंत होळकर, वय ३८ वर्षे, रा. हांडेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे साठवणूक केलेल्या गॅस टाक्यांच्या अधिकृत परवान्याबाबत विचारणा करता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. तरी सदर इसमांस १०३ गॅस सिलेंडर व चार चाकी गाडी असे एकुण १०,०९,३०० रुपये किंमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेवून सदर इसम याचे विरुध्द काळेपडळ पोलीस ठाणे गु.रजि.क्र.१६४/२०२६ अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर, अतुलकुमार नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो. निरी. अमित शेटे, पो.हवा.प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.




