अपहरण केलेल्या २ वर्षाच्या मुलीची धाराशीव जिल्हयातुन सुखरुप सुटका, भिक मागण्यासाठी अपहरण केलेल्या टोळीचा पर्दाफाश..!

दिनांक २५/०७/२०२५ रोजी २१/०० वा ते दिनांक २६/०७/२०२५ रोजी रात्रौ ०१.३० वा चे सुमा. वंडर सिटी झोपडपट्टी, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज, पुणे या ठिकाणाहुन यातील फिर्यादी यांची पिडीत मुलगी वय २ वर्षे हिस कोणीतरी झोपेतुन उचलुन पळवून नेले म्हणुन दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं ३५३/२०२५, भा.न्या.सं.क. १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे तसेच पिडीत मुलगी ही २ वर्षाची असल्यामुळे मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी पिडीत मुलीचा तात्काळ शोध घेणेबाबत सर्व अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांनी तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या दोन टिम तयार केल्या. तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके, बाहेरील पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची तपास पथके तयार करुन कात्रज ते पुणे स्टेशन दरम्यानचे रोडवरील आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यामध्ये दोन पुरुष व एक महीला हे एका दुचाकी गाडीवरुन पिडीत मुलीस पुणे रेल्वे स्टेशन मध्ये घेवुन जाताना दिसुन आले. पुणे रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करता त्याठिकाणी पिडीत मुलीस पळवुन आणणारे तीन इसमांचे सोबत आणखी दोन आरोपी असल्याचे दिसुन आले. त्याठिकाणावरुन आरोपींची चेहरे स्पष्ट करुन त्या आरोपींची गोपनिय माहीती घेतली असता आरोपी हे तुळजापुर, जि. धाराशीव या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहीती भारती विद्यापीठ तपास पथक व गुन्हे शाखा, युनिट ०२, पुणे यांना मिळाली.
प्राप्त असलेली खात्रीशीर माहीती वरिष्ठ अधिकारी यांना दिल्यानंतर मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोउपनि मोकाशी व पोलीस अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट ०२ चे सपोनि आशिष कवठेकर व पोलीस अंमलदार अशी दोन पथके तुळजापुर, जि. धाराशीव या ठिकाणी जावुन पिडीत मुलीचा व आरोपींचा शोध घेवु लागले. स्थानिक धाराशिव एल सी बी पोलीसांचे मदतीने भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण पध्दतीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन आरोपी नामे १) सुनिल सिताराम भोसले, वय ५१ वर्षे, धंदा मजुरी, रा. मोतीझारा, तुळजापुर, धाराशीव २) शंकर उजन्या पवार, वय ५० वर्षे, रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव ३) शालुबाई प्रकाश काळे, वय ४५ वर्षे, रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव ४) गणेश बाबु पवार, वय ३५ वर्षे, रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव ५) मंगल हरफुल काळे, वय १९ वर्षे, रा. रेंज हिल, खडकी रेल्वे लाईनझोपडपट्टी, खडकी पुणे यांना ताब्यात घेतले. नमुद आरोपींकडे तपास करता त्यांचेकडे दाखल गुन्ह्यातील पिडीत ०२ वर्षाची मुलगी सुखरुप मिळुन आली. नमुद आरोपींनी पिडीत मुलीस भिक मागण्याकरता अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे २. पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जितेंद्र कदम, गुन्हे शाखा युनिट ०१ पुणेकडील पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाटगे, तसेच गुन्हे शाखा युनिट ०२ पुणेकडील पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि वैभव मगदुम, भारती विद्या पो स्टे कडील सपोनि स्वप्नील पाटील, पोउपनि निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, तसेच गुन्हे शाखा २ कडील पोलीस अंमलदार जाधव, शंकर कुंभार, आबा मोकाशी, विजय पवार, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओम कुंभार, संतोष टकले, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, सद्दाम तांबोळी, शुभम देसाई, मयुर भोसले, निलेश साबळे, अमित जमदाडे तसेच धाराशिव एल सी बी चे पोहवा समाधान वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.




