शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेस आक्रमक, सरकारविरोधात केले आंदोलन

पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथे राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेची (ठाकरे गट) नेतेही सहभागी झाले होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, संगीता तिवारी, मनीषा आनंद, अजित दरेकर, शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, संजय मोरे, गजानन थरकुडे, आम आदमी पक्षाचे अभिजीत मोरे आदी उपस्थित हाेते.

Advertisement

यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हाणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळतो ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. राज्यातील भाजपा युती सरकार हे कमिशनखोर आहे. हे सरकार सिमेंट, वाळू, विटा, लोखंड यातही कमिशन खाते. त्यांना कशाचीच लाज वाटत नाही. शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्याचे काम ठाण्यातील नवखा, अनुभव नसलेला शिल्पकार आपटे याला दिले. या कामावर २.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर ५ कोटी रुपये सौंदर्यीकरणावर खर्च करण्यात आले. वास्तविक पाहता छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ व अनुभवी व्यक्तीला द्यायला हवे होते, असेही ते म्हणाले.

संपादक- आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक- अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page