मसाज सेंटरचे नावाखाली वेश्या व्यवसाय करणा-या हॉटेलवर छापा कारवाई..!

बाणेर पोलीस स्टेशन हददी मध्ये मसाज सेंटरचे नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहीती प्रमाणे दिनांक ०८/०७/२०२५ रोजी केलेल्या छापा कारवाई बाबत.
दि.०८/०७/२०२५ रोजी श्रीराम यशदा बिल्डींग, पहीला मजला ऑफीसनं ०२, बालेवाडी फाटा बाणेर पुणे येथील एक स्पा सेंटरवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची खास बातमीच्या आशयावरुन छापा टाकला असता सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने छापा टाकुन कारवाई करण्यात आली त्यामध्ये १) स्पा मॅनेजर अब्बास अब्दुल मतीन हुसेन, वय-२१ वर्षे, रा. ममतानगर कॉलनी नं ०१ सांगवी पुणे मुळ रा. ग्राम कांदुलिमारे, थाना- जमनामुग, जि. हुजय, राज्य आसाम व इतर पाहिजे तीन आरोपी यांनी यातील ०२ पिडीत महिला यांना वेश्या व्यवसाया करिता प्राप्त करुन घेऊन पैशांचे अमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करुन स्पा च्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन तसेच भाडेकरुबाबत जवळच्या पोलीस स्टेशनला कोणतीही माहीती न देता, आपली स्वतःच्या मालकीची जागा वेश्या व्यवसायासाठी उपलब्ध करुन देवुन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवित असताना मिळून आले म्हणुन सरकारतर्फे सदर इसमांविरुध्द अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकायदा १९५६ चेकलम ३,४,५, व बी.एन.एस. कलम १४३,२२३.३(५) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४, पुणे शहर श्री. सोमय मुंढे, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, सपोनि झरेकर, सपोनि थिटे, सपोनि कदम, म. पोलीस अंमलदार योगिता मिसाळ, क्षिरसागर पोलीस अंमलदार वणवे, भोरे, खुडे, बर्गे यांनी केली.




