बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड हस्तगत..!

दि.०९/०७/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, नॅन्सी लेक होम सोसायटीकडुन लेकटाऊनकडे एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन लेकटाऊनकडे जात आहे. लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी नॅन्सी लेक होम कडुन लेकटाऊनकडे जाणाऱ्या रोडवर जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता स्व. शंकरराव राजाराम कदम स्वीमींग टँक समोरील बाजुचे रोडवर एक विधीसंघर्षीत बालक, हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ५०,५००/- रुपयांचे मुद्देमालासह दिनांक ०९/०७/२०२५ रोजी मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२९/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयामध्ये पाहीजे आरोपीचा शोध चालु आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. राजेश बनसोडे मा. मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page