पीएमटी बसमध्ये विविध ठिकाणी चोऱ्या करणारा अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद..!

दिनांक ११/०७/२०२५ रोजी मा. वरिष्ठांचे आदेशान्वये वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक चनाजी टोणे हे पोलीस स्टाफसह गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पिलाणे व विष्णु सुतार यांना त्यांचे गोपनिय बातमीदारांमार्फतीने बातमी मिळाली की एक संशयित इसम शिंदेवस्ती, कैनॉलजवळ या भागात फिरत असून तो शोन्याचे दुकान कोठे आहे व जुने सोने विकायचे आहे अशी विचारपुस करत असुन त्याचेकडे काहीतरी संशयित बस्तु आहे. रादर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वानवडी पोलीस तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांनी स्टाफसह रादर ठिकाणी जाऊन संशयीत इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव चंद्रकांत राजु जाधव, वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, रा. स.नं. ३६. सर्वोदय कॉलनी, जमाल बाबा दर्याच्या पाठीमागे, मुंढवा, पुर्ण असे असलाचे सांगितले. सदर व्यक्तीची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ४ तोळे वजनाच्या सोन्याचे तीन बांगड्या आवळुन आल्या असून त्यांची अंदाजे किंमत ३.५१,०००/-रु. आहे. नमुद दागिन्यांबाबत त्याचेकडे विचारणा केली असता, त्याने पी.एम.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांच्या हातातील तीन बागडया चोरी करुन काढल्या आहेत असे सांगितले. वानवडी पोलीस ठाणेकडील अभिलेखाची पडताळणी केली असता, वानचही पोलीस स्टेशन गु.र.नं. २६१/२०२५. मा.न्या.सं.क. ३०३ (२) व गु.र.नं. २७९/२०२५, मा.न्या.सं.क. ३०९ (४) प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आरोपी नामे चंद्रकांत राजु जाधव, वय ३१ वर्षे, धंदा मजुरी, रा. स.नं. ३६, सर्वोदय कॉलनी, जमाल बाबा दग्र्याच्या पाठीमागे, मुंढवा, पुणे याने गुन्हे केल्याचे निशान झाले असुन त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर आरोपीकर वाकड पो.स्टे. येथे ०१, सांगवी पो.स्टे. ०२, चतुः श्रृंगी पो.स्टे येथे ०२, निगडी पो.स्टे. येथे ०१, वाकड पो.स्टे. येथे ०१. मुंढवा पो.स्टे. येथे ११, वानवडी पो.स्टे. येथे ०२ असे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर डी. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, श्री. धन्यकुमार गोडसे, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. सत्यजित आदमाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, पोलीस अंमलदार दया क्षेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, यतीन भोसले, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण, दिपक क्षीरसागर, अमोल गायकवाड, विद्वल चोरमले था पथकाने केली आहे.




