मौजमजेसाठी घरफोडी करणारे चोरटे ०४ तासात जेरबंद..!

दिनांक ०५/०७/२०२५ ते दिनांक ०६/०७/२०२५ रोजी शार्प कलर दुकान, ५०६/५०७ एच. एस. कादरी टॉवर, मॉर्डन हॉस्पीटल समोर, नाना पेठ पुणे येथे दुकानाचे शटर वाकवुन, उचकटुन, शटरला लावलेले कुलूप तोडुन दुकानात प्रवेश करुन, दुकानातील टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले १५,५००/-रु. चोरुन नेलेबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १५०/२०२५ भा.न्या. सं.क.३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयांच्या अनुषंगाने मा. वरीष्ठांच्या आदेशाने तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख यांनी घटनास्थळी तसेच आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केले. तसेच त्यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने चोरी करणा-य अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन त्यांना शिताफीने पकडण्यात आले. सदर इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) सुजल राजन परदेशी वय-२० वर्षे रा. शिवाजी स्टेडीअम समोर २१७ मंगळवार पेठ पुणे. २) सुभाष राजेश सरोज वय-२१ वर्षे रा. शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ पुणे ३) नितीन दिलीप सरोज वय-२२ वर्षे रा. सदर ४) रोहीत मुन्नालाल सरोज वय-२२ वर्षे रा. सदर असे सांगितले. सदर आरोपींनी मौजमजेसाठी दि.०५/०७/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास शार्प कलर दुकान, संत कबीर चौक येथील चोरी केल्याची कबुली दिली असुन आरोपींकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेली रक्कम जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. चेतन मोरे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश, यादव यांनी केली आहे.




