कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; चोरट्यांना पकडून २० दुचाकी केल्या जप्त

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सराईत तिन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून कोंढवा पोलिसांनी तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत. २ बुलेट, ६ स्प्लेंडर, ३ अ‍ॅक्टिव्हा, १ ज्युपिटर २ शाईन, १ ड्रिम युगा, ३ पॅशन, २ एच एफ डिलक्स अशा वेगवेगळ्या दुचाकी त्यांनी चोरल्या होत्या. या गाड्यांना ग्राहक मिळेपर्यंत त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या.

गौस मिरासाहब शेख (वय २०, रा. बावलगाव, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक सध्या रा. हांडेवाडी), शाहरुख कासीम शेख (वय २५, मुळ रा. गुंडपंत, दापका, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या रा. हांडेवाडी) आणि जुबेर अहमद मंगरुळे (वय २९, रा. गुंडपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या रा. शिवनगरी पार्क, दिघी, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे पेट्रोलिंग करुन सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिल्या होत्या. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, सागर भोसले हे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत होते. तसेच पोलीस हवालदार निलेश देसाई त्यांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त ठिकाणाचे तांत्रिक विश्लेषण करुन संशयित वाहन चोरीचे आरोपी निष्पन्न केले. हे संशयित आरोपी ध्रुव ग्लोबल स्कुलचेय्या मागील बाजूस मोकळया ठिकाणी नेहमी येत असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली.

Advertisement

पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, संतोष बनसुडे, सागर भोसले, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सुजित मदन यांनी दोन पथके तयार करुन त्या ठिकाणी गेले. तेव्हा तेथे लागलेल्या दुचाकीवर तिघे जण गप्पा मारत बसलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यांना पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी वाहन चोरीची कबुली दिली. त्यांनी वेगवेगळ्या २० दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या ७ लाख ३० हजार रुपयांच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यातून कोंढव्यामधील ९, हडपसरमधील २, भारती विद्यापीठमधील २ तसेच वानवडी, मुंढवा, लोणीकंद, यवत, चिखली, चिंचवड या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे २० गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन या पथकाने केली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page