हिंगोली जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा शोध घेवुन, तीला हिंगोली पोलीस व नातेवाईकांचे ताब्यात सुखरुप देण्यात पोलीसांना यश..!

दिनांक ०८/०७/२०२५ रोजी हद्दीमधील रेड अलर्ट एरियामध्ये पायी पेट्रोलींग करीत असतांना, दत्त मंदीराजवळ एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद फिरत असतांना मिळुन आल्याबाबत पोलीस मित्र यांनी फरासखाना पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे यांना कळविले. सदर बाबत वरिष्ठांच्या आदेशान्वये तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे व पोलीस अमंलदार गजानन सोनुने, राऊत व गुंजाळ यांनी प्राप्त बातमीचे अनुषंगाने सदर मुलीस ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली. सदरची मुलगी (निर्भया) वय १६ वर्षे ही वारंगा फाटा, ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील असल्याचे समजले. तीस विश्वासात घेवुन येथे येण्याचे कारण विचारले असता, तीने आई-वडीलांसोबत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागाने रहाते घरातुन निघुन आल्याचे सांगितले. त्याबाबत फरासखाना पोलीसांनी कौशल्यपणे तपास करुन, मिळुन आलेल्या मुली बाबत आखाडा पोलीस स्टेशन जिल्हा हिंगोली येथे चौकशी केली असता हिंगोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४४८/२०२५ भा.न्या.सं.क. १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळाली. सदर गुन्हयाचे तपास अधिकारी यांचेसोबत संपर्क साधुन, त्यांना हकीकत सांगुन, मुलगी सुखरुप ताब्यात असल्याची खात्री करुन देवुन, मुलीला आखाडा पोलीस स्टेशन येथील पोलीस व मुलीचे आई-वडील तसेच तिचे नातेवाईक यांचे ताब्यात सुखरुप देवुन, गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अजित जाधव, सपोनि उत्तम नामवाडे, पोलीस अंमलदार वैभव गायकवाड, गजानन सोनुने, रेखा राऊत, सारीका गुंजाळ, अनिता साबळे, मनिषा पुकाळे, अर्चना ढवळे, सोनाली भालेराव, पोलीस मित्र तेजश्री कुपरे, प्रसाद बनासोडे व कार्तीक घोडेकर यांनी केलेली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page