कोंढवा : अपघात झाल्याने 13 वर्षे गंभीर जखमी ससुन रुग्णालय येथे सदर मुलगा उपचारा दरम्यान मयत झाला..!

ता. 18/05/2025 रोजी 18/00 वा चे सुमारास कोंढवा बु गावठाण येथील भोलेनाथ चौक येथे इनेव्हा कार क्र MH 31 CA 5888 या कारने अपघात झाल्याने त्याभागात राहणारा निवृत्ती बाजीराव किसवे वय 13 वर्षे गंभीर जखमी झाला होता.ससुन रुग्णालय येथे सदर मुलगा उपचारा दरम्यान मयत झाला आहे.
इनवोहा कारचा चालक नामे जैद नसीर शेख वय23 रा. भाग्योदयनगर कोंढवा खु यांनी मद्यप्राशन केले आहे का याची तपासणी करणे कामी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आलेले होते. तसेच त्याची ट्राफिक अंमलदार यांच्याकडील ब्रेथ अनालयझरने तपासणी केली असता निगेटीव्ह अहवाल आला आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तपास पथकाच्या मदतीने सीसीटीव् फुटेज पाहत आहोत.
सदर चालक जैद नसीर शेख वय23 रा. भाग्योदयनगर कोंढवा खु यास अटक करण्यात आली असून याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विनय पाटणकर
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
कोंढवा पोलिस ठाणे




