डेक्कन, बाणेर, येरवडा या ठिकाणी रात्रीचे वेळी बळजबरीने मोबाईल हिसकावुन घेवुन जाणारे आरोपी डेक्कन पोलीसांच्या ताब्यात..!

घेवुन जाणारे आरोपी डेक्कन पोलीसांच्या ताब्यात..!

डेक्कन, बाणेर, येरवडा या ठिकाणी रात्रीचे वेळी बळजबरीने मोबाईल हिसकावुन

घेवुन जाणारे आरोपी डेक्कन पोलीसांच्या ताब्यात

डेक्कन पोलीस ठाणे हददीत रस्त्यात मोबाईलवर बोलत थांबलेल्या नागरीकांच्या हातातील मोबाईल दुचाकीवरुन वेगाने येवुन बळजबरीने हिसकावुन घेत असलेबाबत डेक्कन पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने डेक्कन पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असता प्राप्त असलेल्या गोपनिय माहितीवरुन आरोपी फिरत असलेल्या ठिकाणी हालचालींवर लक्ष ठेवनु गस्त करुन त्यांच्या संदर्भात इतर माहिती प्राप्त करुन त्या आधारे १ आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव हबीब अबालु इराणी, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं ०८, पाटील ईस्टेट, पुणे मुंबई रोड जवळ, पुणे तसेच रू.नं. २०१, फ्रेडस रेसिडन्सी, रशिद कंपाऊंड मुंब्रा, ठाणे शहर असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक तपास करता गेल्या काही महिन्यांमध्ये डेक्कन परिसरात रात्रीच्या वेळी बळजबरीने घोरलेले ४ मोबाईल सदर आरोपीकडुन हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्या कडुन हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हे डेक्कन पोलीस ठाणे येथे १) गु.र.नं.८९/२०२४ भादवि कलम ३९२,३४ २) गु.र.नं ११/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५) दाखल असलेले बळजबरीने चोरीस गेलेले मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर आरोपीने वीरभद्रनगर बाणेर येथे कॅबची वाट बघत उभे असलेल्या व्यक्तीकडुन बळजबरीने हिसकावुन घेतलेल्या मोबाईलच्या अनुषंगाने बाणेर पोलीस ठाणे गु.र.नं ३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २०२३ चे कलम ३०४ अन्वये बाणेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

Advertisement

वर नमुद दाखल गुन्हे हे हबीब अबालु इराणी यौनेच केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आली असुन हबीब अबालु इराणी, हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी नमुद आरोपीवर १) यवत पोलीस स्टेशन २) लोहमार्ग पोलीस ठाणे ३) हडपसर पोलीस ठाणे ४) लोहमार्ग पुणे पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागाचे श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ श्री. संदिप सिंह गील्ल, मा. सपोआ विश्रामबाग विभाग, श्री. साईनाथ ठोंबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पो.स्टे. श्रीमती गिरीषा निंबाळकर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री.प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे पोलीस उप- निरीक्षक महेश भोसले, अजय भोसले. दत्तात्रय सावंत, सहा. पो. फौजदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, मपोहवा धनश्री सुपेकर, पो.हवा गभाले, महेश शिरसाठ पोलीस अंमलदार सागर घाडगे, वसीम सिद्धीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, निलेश सोनवणे, नागनाथ म्हस्के या पथकाने केलेली आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page